अर्धा वाटा

home / अर्धा वाटा

जेव्हा लालची रक्षकाने बिरबलाकडे लाचेची मागणी केली, तेव्हा बिरबलाने त्याला कसा धडा शिकवला? वाचा अर्धा वाटा - बिरबलाचे चातुर्य मराठी रंजक कथा फक्त मराठी वाणी (Marathi Vaani) वर. Read how Birbal outsmarted a greedy guard in this popular Marathi kissa.

राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एकदा नवीन पहारेकऱ्याची नेमणूक झाली. तो बिरबलाला ओळखत नव्हता. त्याने राजवड्यात जाणाऱ्या बिरबलालाच अडवले.

पहारेकरी – तुम्हाला आत जाता येणार नाही.

बिरबल – अरे पण माझे तातडीचे काम आहे.

पहारेकरी – प्रत्येक जण असेच सांगून आत घुसण्याचा प्रयत्न करत असतो.

बिरबल – हे बघ, तू नविन दिसतोस. तू मला ओळखलेले नाही वाटते, अरे मी बिरबल आहे. माझे महाराजांकडे काम आहे.

पहारेकरी काही केल्या बिरबलाला आत सोडत नव्हता शेवटचा उपाय म्हणून बिरबलाने एक युक्ती केली.

बिरबल – हे बघ. तू मला आत सोड आत गेल्यावर मला जे काही मिळेल त्यातील अर्धा वाटा तुझा.

हे ऐकून पहारेकरी खूष झाला व त्याने बिरबलाला आत सोडले.

बिरबल आत गेल्यावर बादशहाला एक खूषीची बातमी सांगितली बादशहा खूष झाले व त्यांनी बिरबलाला विचारले. आम्ही तूझ्यावर खूष आहोत काय मागायचे ते माग.

बिरबल – महाराज! मला शंभर फटके मारावेत एवढी च माझी मागणी आहे.

बादशहा या मागणीने चकीत झाला.

बादशहा – बिरबलाची मागणी पूर्ण करा.

बिरबल – थांबा! माझ्या या मिळकतीत एक जण भागीदार आहे. आधी त्याला त्याचा वाटा द्यावा लागेल.

बिरबलाने प्रवेश द्वारावर घडलेला प्रकार सांगितला.

बादशहाने त्या पहाऱ्याकऱ्यास बोलावून घेतले व त्यास शिक्षा केली.

अशा प्रकारे बिरबलाने त्या पहरेकऱ्याला आपल्या कर्तव्याची जान करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags