बिरबलाची खिचड़ी

home / बिरबलाची खिचड़ी

'बिरबलाची खिचड़ी' हा किस्सा तर सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. बिरबलाने बादशहाला आपली चूक कशी उमजवून दिली, हे वाचण्यासाठी मराठी वाणी (Marathi Vaani) वर नक्की या. The world-famous story of Birbal's slow-cooking khichdi to prove a point to the Emperor.

बिरबलाची खिचड़ी – एक मजेशीर कथा

हिवाळ्याचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती. बिरबल व बादशहा फिरत फिरत तळ्याजवळ आले.

बादशहा – कोण शुर या गार पाण्यात उघड्या अंगाने उभा राहील.

बिरबल – मनुष्य पैशासाठी काहीही करू शकतो. असा मनुष्य भेटला तर काय देणार.

बादशहा – एक हजार मोहरा देईन.

बिरबल गावातील एका गरीब घोब्याकडे गेला.

बिरबल – तू रात्रभर थंड पाण्यात उभा राहीला तर बादशहा तूला एक हजार सोन्याच्या मोहरा देईल. तूझे जन्मांचे दारिद्र संपेल.

धोबी – हो, मी तयार आहे. दोघे बादशहाच्या महालात जातात.

बादशहा – खरचं तू रात्रभर थंड पाण्यात उभा राहशील? ते ही उघड्या अंगाने ?

धोबी – हो महाराज.

त्या रात्री तो धोबी रात्रभर पाण्यात उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सुर्य उगवला व धोबी पाण्यातून बाहेर आला.

धोबी – मी जिंकलो मला बादशहाकडे घेऊन चला असे त्याने शिपायाला सांगितले.

बादशहा – तू खरचं रात्रभर पाण्यात उभा राहिला होतास? आणि तेही रात्रभर इतक्या कडाक्याच्या थंडीत! तू हे कस काय केले?

धोबी – रात्रभर रस्त्यावरच्या दिव्याकडे बघून मी ध्यान करत उभा राहीलो होतो.

बादशहा – तरीच! दिव्याची ऊब तूला मिळाली म्हणूनच तू रात्रभर उभा राहू शकलास. तूला बक्षीस मिळणार नाही.

निराश होऊन तो गरीब धोबी बिरबलाकडे आला व त्याने झालेला प्रकार सांगितला.

बिरबल – तूला ठरलेले बक्षीस मिळवून देण्याची जबाबदारी माझी. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात वेळेवर आला नव्हता.

बादशहा ने एका शिपायाला बिरबलाच्या घरी पाठवले व बिरबलाला घेऊन येण्यास सांगितले.

शिपाई – सरकार ते खिचड़ी शिजवत आहेत. ती शिजली की येणार आहेत.

बराच उशीर झाल्याने शिपायाता परत पाठवले. पुन्हा शिपायाने तोच निरोप राजाला सांगितला. खिचड़ी शिजली की येतो. राजा विचारात पडला. बिरबल असली कसली खिचड़ी शिजवत आहे. आणि बिरबलाची खिचड़ी का नाही शिजत आहे? राज स्वतः पाहण्यासाठी गेला. बादशहा बिरबलाच्या घरी पोहचला. त्याला अजब प्रकार पहायला मिळाला. तिन काठयांच्या वर उंच मडक्यात बिरबल खिचड़ी बनवत होता.

बादशहा – अरे जमीनीवर जाळलेल्या काटक्यांची उष्णता एवढ्या उंचावरील मडक्यांपर्यंत कशी पोहचणार. आणि तूझी खिचड़ी कशी शिजणार.

बिरबल – न शिजायला काय झाले? तळ्यातल्या माणसाला रस्त्यावरील दिव्यापासून उष्णता मिळू शकते तर मग माझ्या खिचडीला इथल्या इथं उष्णता का मिळणार नाही?

बादशहाला आपली चूक समजली व त्याने त्या गरीब धोब्याला बक्षीसाची रक्कम दिली. अशा प्रकारे बिरबलाने पुन्हा एकदा आपल्या बुद्धीने धोब्याला न्याय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags