दिल्लीमध्ये कावळे किती? अकबर आणि बिरबल मराठी कथा
एके दिवशी दरबार भरला असता. बादशहा ने आपल्या दरबारातील सभासदांना एक प्रश्न विचारला.
बादशहा-कोणी सांगू शकेल की आपल्या दिल्लीमध्ये कावळ्यांची संख्या किती आहे.
हा प्रश्न एकून सर्व दरबारी गप्प राहीले, पण चतुर बिरबलाला जेव्हा हा प्रश्न विचारला.
बिरबल-मी सांगतो महाराज.
दुसऱ्या दिवशी बिरबला ने उत्तर दिले. महाराज आपल्या दिल्लीमध्ये पंधराशे कावळे आहेत. महाराज हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाले.
बादशहा-बिरबल तू ही संख्या नक्की कशी काय सांगितली. जर ही संख्या कमी-जास्त भरली तर…
बिरबल-महाराज, कमी भरली तर समजावे की काही कावळे आपल्या नातलगांना भेटण्यास बाहेरच्या राज्यात गेले आहेत व जास्त संख्या भरली तर समजावे की बाहेरच्या राज्यातील काही, कावळे आपल्या नातलगांना भेटण्यास आले आहेत. हे उत्तर ऐकून बादशहा खूष झाले व बिरबलाला शंभर सोन्याच्या मोहरा भेट दिल्या.







