घडाभर अक्कल

home / घडाभर अक्कल

बादशहाच्या विचित्र मागण्यांना बिरबल नेहमीच चोख उत्तर द्यायचा. 'घडाभर अक्कल' ही कथा देखील त्याच धाटणीची आहे. अशाच प्रेरणादायी अकबर बिरबल मराठी स्टोरीजचा आनंद घ्या. A clever tale of how Birbal fulfilled the Enemies strange demand for a pot full of wisdom.

अकबरची व बिरबलाची जीरवण्यासाठी शेजारील राजाने एक पत्र पाठवले, त्यात लिहले होते, आम्हाला घडाभर अक्कल पाहिजे. ती चार महिन्याच्या आत पाठवावी अक्कल नसेल तर तसे कळवावे.

नेहमी प्रमाणे अकबर बादशहाने हे काम बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने थोडा विचार केला व तो आपल्या कामाला लागला. भोपळ्याच्या काही बीया त्याने शेतात लावल्या दोन महिन्यानंतर बिरबलाने लावलेल्या. भोपळ्याचा वेल चांगला वाढला मग बिरबल कुंभाराकडे गेला.

बिरबल कुभाराला म्हणाला-लहान तोंडाचे व मोठ्या आकाराचे पाच घडे बनवून दे. कुंभाराने पाच घडे बनवून दिले. बिरबलाने वाढत असलेले भोपळे त्या घड्यान सोडले. काही दिवसांनी वाढलेते भोपळे वेलापासून वेगळे करून ते घडे घेऊन बिरबल बादशहा कडे आला.

बिरबल-हे घ्या महाराज, यातील एक घडा शेजारच्या राज्याकडे पाठवून द्या. तसेच त्याबरोबर एक पत्र पाठवा. आपल्या मागणीनुसार घडाभर अक्कल पाठवण्यात आली आहे. घडा न फोडना नी काढून घ्या अक्कलं पुरणार नसेल तर तो घडा परत पाठवा आजून चार घडे आमच्याकडे शिल्लक आहेत.

शेजारच्या राजाला कळले की खरच बिरबल सारखा व्यक्ती कोठेही नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags