बादशहाचा पोपट

home / बादशहाचा पोपट

बादशहाचा लाडका पोपट जेव्हा दगावला, तेव्हा ती बातमी बादशहापर्यंत पोहोचवण्याचे धाडस कोणी केले? पहा बिरबलाची समयसूचकता फक्त मराठी वाणी (Marathi Vaani) वर. A clever story showing how Birbal delivered bad news without upsetting the Emperor.

बादशहाचा पोपट

बादशहाला एका फकिराने पोपट भेट दिला. त्याला तो फारच आवडला.

फकीर-तूझ्या राज्याची भरभराट होवो हा पोपट तूझ्यासाठीच आणला आहे.

तो पोपट बोलका असल्यामुळे बादशहाला त्याचा लळा लागला. फकिरावर श्रद्धा असल्याने बादशहाने त्या पोपटाची देखभाल करण्यासाठी खास नोकर ठेवला. दरबारात जाण्यापूर्वी तो पोपटाला भेटून जायचा.

बादशहाने नोकराला बजावले, नीट लक्ष दे याच्याकडे त्याचे बरे वाईट झाल्याची बातमी आणलीस तर तूला फाशीची शिक्षा होईल.

बिचारा नोकर खूप घाबरला.

…. आणि एके दिवशी सकाळी नोकराने पाहिले की पोपटाची काहीच हालचाल दिसत नाही तो तर मेला आहे.

नोकर घाबरला. आता काय करायचे. त्याला सुचेना बादशहाकडे जाण्याचे धाडस होईना त्याने बिरबलाकडे धाव घेतली.

नोकर-आता माझा जीव तूम्हीच वाचवा.

बिरबल-काही काळजी करू नकोस मी जातो बादशहाकडे.

बिरबल बादशहाकडे आला व म्हणाला महाराज आपला पोपट मोठा योगी झाला आहे. आकाशाकडे तोंड करून, डोळे मिटून ध्यान करतो आहे. अजिबात हालचाल करत नाही.

हे ऐकून बादशहा चकित झाले. बादशहा व बिरबल दोघे पिंजऱ्याजवळ येतात.

बादशहा-तू स्वतःला हुशार समजतोस आणि पोपट मेला की जिवंत आहे तूला कळत नाही. सरळ सांगायचे ना पोपट मेला आहे.

बिरबल-कसं सांगणार? पोपट मेला अस सांगणाऱ्याला तूम्हीतरं देहदंडाची शिक्षा देणार आहात.

सर्व प्रकार बादशहाच्या लक्षात आला व तो बिरबलाच्या या युक्तीवर हसू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags