न्याय – बिरबलाचा अचूक निवाडा

home / न्याय – बिरबलाचा अचूक निवाडा

जेव्हा दरबारात कठीण पेच निर्माण व्हायचा, तेव्हा केवळ बिरबलच योग्य 'न्याय' करू शकत असे. मराठी वाणी (Marathi Vaani) वर वाचा बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे नवनवीन पैलू. Witness Birbal's fair and witty judgment in this classic courtroom story.

राजीव व प्रसाद नावाचे दोन मित्र होते. त्यांच्या अंगणात आंब्याचे झाड होते. त्या झाडाच्या मालकीवरून दोघांचे भांडण झाले. त्यांचे भांडण शेवटी बादशहाच्या दरबारात गेले.

राजीव-सरकार आता तुम्हीच न्याय करा.

बादशहाने त्यांना बिरबलाकडे पाठवले.

बिरबल-या झाडाची राखण कोण करतो.

प्रसाद-आमच्या दोघांतर्फे रात्रीचा एक रखवालदार तिथे असतो.

बिरबलाने रखवालदारास बोलावून घेतले व विचारले-तू कुणासाठी राखण करतोस?

रखवालदार-सरकार मोहोर लागला तेव्हा माझी नेमणूक झाली खरा मालक मला माहीत नाही.

बिरबलाने राजीव व प्रसाद दोघांना घरी पाठवले व रखवालदाराला एक काम सांगितले.

रखवालदार-ठिक आहे! आपल्या आज्ञेप्रमाणे काम होईल.

त्या दिवशी रात्री रखवालदार राजीवच्या घरी गेला. तेव्हा त्याला राजीवची पत्नी भेटली.

रखवालदार-मालक कुठे आहेत.

पत्नी-झोपले आहेत.

रखवालदार-अहो उठा लवकर आंबे तोडण्यासाठी चोरटे आले आहेत. ते चार-पांच जण आहेत. मला एकट्याला त्यांचा सामना करता येणार नाही.

पत्नी घरात जावून राजीवला उठवते. व आंबे तोडण्यासाठी चोरटे आले आहेत असे सांगते.

राजीव-काय कटकट आहे. मी काय त्यांच्याशी सामना करणार? जाऊ दे, त्या आंब्यापायी माझा जीव जायचा.

त्यानंतर बिरबलाच्या सांगण्यानुसार रखवालदार प्रसादच्या घरी गेला.

रखवालदार-मालक, आंबे चोरण्यासाठी हत्यारे घेऊन चोरटे आले आहेत.

प्रसाद-चल लवकर कुठे आहेत चोरटे ?

प्रसादची पत्नी-अहो, असे कुठे चाललात जेवण तरी करा.

प्रसाद-अगं, आंबे तोडण्यास काही चोरटे आले आहेत. त्यांना पकडले नाही तर सगळी मेहनत पाण्यात जाईल. प्रसाद तसाच घराबाहेर पडला.

प्रसाद-कोण आहे तिकडे चालते व्हा!

ती बिरबलाने पाठवलेली माणसे होती पळत निघून गेली तसेच दुसऱ्या दिवशी गुप्तहेरांनी राजीव व प्रसादच्या घरी घडलेला प्रकार सांगितला. त्याच वेळी झाडाचा खरा मालक बिरबलाला समजला.

दुसऱ्या दिवशी दरबार भरला असता बिरबल म्हणाला, या झाडावर दोघांची मालकी आहे. त्याची निम्मे-निम्मे आंबे वाटून घ्या व झाड तोडून लाकडेही निम्मी-निम्मी घ्या म्हणजे हा वाद कायमचा सुटेल. या न्यायाने राजीव खूष झाला व प्रसादला दुःख झाले.

प्रसाद-सरकार सर्व झाड राजीवला दिले तरी चालेल. पण ते तोडू नका, मला ते बघवणार नाही.

हे ऐकताच बिरबलाला खात्री झाली की प्रसादच झाडाचा खरा मालक आहे.

बिरबल-महाराज! प्रसादच झाडाचा खरा मालक आहे. त्याचे झाडावर खरे प्रेम आहे. म्हणूनच चोरटे आल्यावर तो तातडीने बाहेर आला. तसेच झाड तोडणेही त्याला मान्य नाही. कारण त्याने ते लहानपणा पासून वाढवले आहे.

हे ऐकून राजाने पूर्ण झाडाची मालकी प्रसादला सोपवली.

अशा प्रकारे बिरबलाने योग्य न्याय केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags