होते ते भल्यासाठीच

home / होते ते भल्यासाठीच

'होते ते भल्यासाठीच' ही म्हण कशी खरी ठरली, हे या कथेतून स्पष्ट होते. मराठी वाणी वरील अकबर बिरबल मराठी स्टोरीज वाचून तुम्हाला नक्कीच स्फूर्ती मिळेल. A Informational story about faith and positive perspective from the life of Akbar and Birbal.

एकदा बिरबल आणि बादशहा शिकारीसाठी जंगलात गेले असताना तलवारीचे पाते बादशहाच्या हाताच्या बोटाला लागले व भळभळा रकत वाहू लागले.

बोटाला कापलेले पाहून बादशहाने बिरबलाला विचारले-देव जर खरा दयाळू आहे, तर माझा काही अपराध नसताना त्याने माझे हे बोट कसेकाय कापू दिले.

बिरबल-महाराज! देव जो करतो ते भल्यासाठीच करतो.

बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहा फारच संतापला आणि म्हणाला-मला अशा माणसाची गरज नाही. मी तुला आताच नोकरीवरून काढून टाकले आहे.

बिरबल म्हणाला-महाराज, मला तुम्हीं नोकरीवरून काढले ही गोष्टही देवाने माझ्या भल्यासाठीच केली असावी.

दोन-चार दिवसांनी आपल्या साथीदारासह बादशहा शिकारीला गेला असता, भटकत-भटकत एकटाच खूप लांबवर गेला आणि आयताच नरमांसभक्षक टोळीच्या कचाटयात सापडला. ते लोक त्याला देवीपुढे बळी देण्यासाठी घेऊन चालले, असताना त्यातील एकाचे लक्ष बादशहाच्या कापलेल्या बोटाकडे गेले. त्याने हे इतर लोकांना सांगितले. त्यावर टोकीचा सुत्रधार म्हणाला. ‘शरीराला जखम किंवा आजारी असलेला ‘माणूस’ देवीला ‘बळी’ म्हणून चालत नाही. तेव्हा ह्याला सोडून द्या.’

म्हणून बादशहाला सोडून देव्यात आले. आता मात्र बादशहाला बिरबलाचे म्हणणे पटले आपले बोट जर कापलेले नसते, तर त्या रानटी लोकांनी आपला बळी दिला असता. बादशहाने लगेच बिरबलाला बोलावून घेतले व परत त्याला नोकरीत घेतले.

बादशहा-माझ्या बोटाला जखम झाली हे देवाने माझ्या भल्यासाठीच केले. हे मला आता पटले पण तुला मी नोकरीवरून काढले, त्यात देवाने तुझे काय भले केले?

बिरबल-महाराज, जर मी नोकरीला असतो तर तुम्ही मला रानात शिकारीला घेऊन गेला असता, व मला त्या रानटी लोकांनी पकडले असते. मला तर कोणतीच दुखापत झाली नाही हे बघून त्यांनी मला बळी दिले असते.

बिरबलाचे हे उत्तर ऐकून राजाही प्रसन्न झाला आणि म्हणाला “बरोबर आहे बिरबल होते ते भल्यासाठीच”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags