लोभी साधू

home / लोभी साधू

समाजात वावरणाऱ्या ढोंगी लोकांपासून सावध राहण्याचा संदेश देणारी 'लोभी साधू' ही कथा अत्यंत रंजक आहे. अशाच अकबर बिरबल मराठी स्टोरीजसाठी मराठी वाणीला भेट देत राहा. A sharp and witty tale about exposing greed and hypocrisy of Birbal Story.

लोभी साधू

गंगाबाईने अनेक वर्षे मोलमजुरी करून थोडे पैसे साठवले होते. गंगाबाईच्या घराशेजारी एक जोडपे राहत होते. ते तिर्थयात्रेला जाणार होते.

शेजारी-गंगाबाई तिर्थ यात्रेला येता का?

गंगाबाई-तूमच्यामुळे मला तिर्थयात्रा घडेल जरूर येईन. गंगाबाईने विचार केला, मला तिर्थ यात्रेला तर जायचे आहे. पण हे पैसे, चोर, लुटारुपासून, सुरक्षीत ठेवायचे म्हणजे विश्वासाच्या माणसाकडे ठेवावे.

गंगाबाई गावातील साधूकडे गेल्या.

गंगाबाई-स्वामी महाराज मी यात्रेला निघाले आहे. माझे पैसे तुमच्याकडे सुरक्षीत राहतील. यात्रेवरून आल्यावर मी परत घेईन.

साधू-ठीक आहे. मी या धनाला स्पर्श ही करणार नाही.

तूच तूझ्या हाताने ते कोपऱ्यात पुरून ठेव. साधूच्या भरवशावर धन ठेवून गंगाबाई यात्रेला गेल्या काही दिवसांनी परत आल्या.

गंगाबाई-महाराज ! माझे धन मला परत द्या.

साधू-मला तूझ्या धनाशी काय कर्तव्य जिथे तू पुरून ठेवले तिथून घेऊन जा.

गंगाबाई-स्वामी महाराज ! माझे धन येथे नाही.

साधू-हे बघ तूझ्या पैशाला मी स्पर्श सुद्धा केला नव्हता, त्यामुळे मला विचारू नकोस. व माझ्या चिंतनात व्यत्यय आणू नकोस.

गंगाबाई निराश होऊन घरी परत आल्या. तिने आपली व्यथा बिरबलाला सांगितली.

बिरबल-तू उद्या साधूकडे धन मागण्यास परत जा तो नक्की देईन.

दुसऱ्या दिवशी बिरबलाने दागिन्यांची भरलेली पेटी शिपायाकडे दिली व शिपायाला काय करायचे ते सांगितले.

शिपाई-स्वामी महाराज ! हे दागिने माझ्या भावाचे आहेत. तो परदेशात गेला आहे. दोन दिवसांनी परत येणार आहे, मी सुद्धा चार दिवसांसाठी परगावी चाललो आहे. दे दागिने आपल्याकडे सुरक्षीत राहतील.

साधुला दागिन्यांचा लोभ सुटला होता.

साधु-मी बैरागी, विरक्त माणूस हे विष माझ्याकडे नको.

शिपाई-म्हणूनच माझा तुमच्यावर विश्वास आहे.

इतक्यात बिरबलच्या सांगण्याप्रमाणे गंगाबाई तिथे हजर झाल्या.

गंगाबाई-महाराज भल्या गरीबाला फसवू नका. माझे धन मला परत द्या.

दागिने घेऊन आलेला सावज हातचे निसटतो की काय. अशी भिती साधूला वाटू लागली.

साधू-अहो असे काय करता, धन ठेवता एकीकडे व पाहता दुसरीकडे, त्या तिकडे कोपऱ्यात उकरून पहा.

गंगाबाईला तिचे धन मिळाले. त्याचवेळी बिरबलाने पाठवलेला दुसरा शिपाई तिथे आला.

दुसरा शिपाई-अरे तुझा भाऊ परदेशानून आला आहे. तू लवकर चल.

पहला शिपाई-महाराज मी निघतो हे दागिने त्याचे त्याला परत करतो.

अशा प्रकारे लोभी साधू महाराज ची फजिती झाली आणि गंगाबाईला तिचे धन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags