दिल्लीमध्ये कावळे किती

home / दिल्लीमध्ये कावळे किती

'दिल्लीमध्ये कावळे किती' हा प्रश्न ऐकल्यावर कोणाचीही फजिती होईल, पण बिरबलाने त्याचे उत्तर कसे दिले हे वाचणे मजेशीर आहे. मराठी वाणी (Marathi Vaani) वरील या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील. Read the legendary humorous response of Birbal to Akbar’s tricky question.

दिल्लीमध्ये कावळे किती? अकबर आणि बिरबल मराठी कथा

एके दिवशी दरबार भरला असता. बादशहा ने आपल्या दरबारातील सभासदांना एक प्रश्न विचारला.

बादशहा-कोणी सांगू शकेल की आपल्या दिल्लीमध्ये कावळ्यांची संख्या किती आहे.

हा प्रश्न एकून सर्व दरबारी गप्प राहीले, पण चतुर बिरबलाला जेव्हा हा प्रश्न विचारला.

बिरबल-मी सांगतो महाराज.

दुसऱ्या दिवशी बिरबला ने उत्तर दिले. महाराज आपल्या दिल्लीमध्ये पंधराशे कावळे आहेत. महाराज हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाले.

बादशहा-बिरबल तू ही संख्या नक्की कशी काय सांगितली. जर ही संख्या कमी-जास्त भरली तर…

बिरबल-महाराज, कमी भरली तर समजावे की काही कावळे आपल्या नातलगांना भेटण्यास बाहेरच्या राज्यात गेले आहेत व जास्त संख्या भरली तर समजावे की बाहेरच्या राज्यातील काही, कावळे आपल्या नातलगांना भेटण्यास आले आहेत. हे उत्तर ऐकून बादशहा खूष झाले व बिरबलाला शंभर सोन्याच्या मोहरा भेट दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags